राज्यातील रक्तसाठ्यात उल्हासनगर काॅंगेसचंही योगदान ! आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

राज्यातील रक्तसाठ्यात उल्हासनगर काॅंगेसचंही योगदान ! आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

राज्यातील रक्तसाठ्यात उल्हासनगर काॅंगेसचंही योगदान ! आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

महाराष्ट्रातली वाढती कोविड रग्णसंख्या आणि त्यातच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब लक्षात घेऊन उल्हासनगर काॅंग्रेसने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम उल्हासनगरातील रेडक्राॅस सोसायटीत आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी मिडिया भारत न्यूज ला दिली.

राज्यातली कोविड सद्यस्थिती पाहता, काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभर सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं तसंच खऱ्या अर्थानं बाबासाहेबाना आदरांजली द्यायची असेल तर १४ एप्रिल रोजी त्यांच्या जयंतीदिनी सर्वानी रक्तदान शिबिरं आयोजित करा , असं म्हटलं होतं. त्याचंच पालन करत उल्हासनगर रैडक्रॉस सोसायटीत कांग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर संपन्न झालं.

सर्वप्रथम रोहित साळवे आणि किशोर धड़के यांनी रक्तदान केलं व त्यानंतर इतर ५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. हा उपक्रम अजून दोन दिवस सुरू राहणार असल्याचं साळवे यांनी सांगितलं.

काँग्रेस महापालिका गटनेता अंजली साळवे, किशोर धडके, रोहित आव्हाड, आशाराम टाक, नीलेश रूपेकर, नारायण गेमनानी, फॅमिदा शेख, भारती फुलवरिया, नयना मनवर, महादेव शेलार, शंकर आहुजा, अनिल यादव, मनीषा महाकले, मनोज मिसाल, मुन्ना श्रीवास्तव, गणेश मोरे, संजय बदाड़े, भागवत तायड़े, आकाश बिरारे, दशरत निमरोट, शिधु, फुले, अवधूत इंगळे, सिद्धार्थ भोजने, अमोल राऊत, राजेश वानखेड़े, विशाल सोनवाने कार्यकर्ता आदी पदाधिकरी उपस्थित होते.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!