शेवटचं काय व्यक्त झाला होता सुशांत ?

शेवटचं काय व्यक्त झाला होता सुशांत ?

शेवटचं काय व्यक्त झाला होता सुशांत ?

“Men have emotions too so don’t be shy to cry. It’s okay to let it out and not hold it inside. It’s not a weakness but a sign of strength. Be man enough to feel. Feeling is human”

एका जिलेट जाहिरातीच्या विडियोक्लिप सोबतचं हे ट्वीट सुशांत सिंह राजपूतने १९ नोव्हेंबर २०१९ ला केलंय. साधारण सहा महिन्यांपूर्वीचं ट्वीट. त्यानंतर अशा प्रकारचं मनातल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भावना व्यक्त करणारं ट्वीट त्याने केलेलं नाही. २७ डिसेंबरनंतर कोणतंही ट्वीट त्याने केलेलं नाही.

३ जूनला तो इन्स्टाग्रामवर आईबद्दल भावना शेअर करताना दिसतो. त्याचा नैराश्येवस्थेचा काळ साधारणतः गेल्या सहा महिन्यांतलाच सांगितला जातो. पण सुशांतच्या वर्तनातला बदल सोशल नेटवर्किंगवर त्याच्या फाॅलोअर्सना दोन वर्षांपूर्वीच जाणवला होता, जेव्हा त्याने त्याचे इन्स्टाग्रामवरचे सगळे फोटो डिलिट केले होते.

तो नंतर विज्ञानवगैरेशी निगडीत पोस्टींग करायला लागला होता. What is wrong with Sushant Singh या मथळ्याखाली इंडियाफोरम्स डॉट काॅमवर १ जून २०१८ ची बातमी पुरेशी बोलकी आहे.

सिनेजगतातल्या मंडळींची नैराश्यावस्था हा एक कायम चर्चेचा विषय आहे. पण तो आतल्या आत धुमसत राहतो. त्यावर मोकळेपणाने फारसं बोललं जातं नाही; पण नैराश्यावस्थेशी आपण कसा संघर्ष केला व त्यातून बाहेर पडलो, हे गेल्या वर्षी उघडपणे सांगून दिपीका पादुकोण ने या विषयाला वाचा फोडली होती.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!