देशावरील संकटकाळात काँग्रेसचं भाजपाच्याच पावलांवर पाऊल !

देशावरील संकटकाळात काँग्रेसचं भाजपाच्याच पावलांवर पाऊल !

देशावरील संकटकाळात काँग्रेसचं भाजपाच्याच पावलांवर पाऊल !

भारत चीन तणावावर काँग्रसने उठवलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळून काँग्रेसला बेजबाबदार ठरवण्याचा घाट घातला आहे. पण जेव्हा काँग्रस सत्तेत होती आणि भाजपा विरोधी पक्षात होता तेव्हा सीमाप्रश्नावरुन भाजपने अनेकदा काँग्रसवर जहरी टिका केलेली आहे.

भाजपाने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर लडाखमधील २० सैनिकांच्या हत्येवर प्रश्‍न उपस्थित केल्याबद्दल टीका केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॉंग्रेसला “बेजबाबदार विरोधी पक्ष” असल्याचा आरोप केला आहे, तर देशाचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी हे घाणेरडं राजकारण करत असल्याची टिका केली.

भाजप सरकारातले अनेक मंत्री काँग्रसवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवत आहेत. भारत चीन तणावावर काँग्रसने उठवलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळून काँग्रेसला बेजबाबदार ठरवण्याचा घाट घातला आहे. पण जेव्हा काँग्रस सत्तेत होती आणि भाजपा विरोधी पक्षात होता तेव्हा सीमाप्रश्नावरुन भाजपने अनेकदा काँग्रसवर जहरी टिका केलेली आहे

२००४ ते २०१४ या काळात भाजपाने अनेक राजकीय ठराव जारी केले होते, श्वेतपत्रिकेची मागणी केली होती, स्वत:चे शिष्टमंडळ सीमेवर पाठवले होते आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर टीका करत अनेक पत्रकार परिषद घेतल्या होत्या. यूपीएच्या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजपाने अनेकदा अशाच मुद्द्यांबाबत सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

भाजप पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या २००४ ते २०१४ दरम्यान भाजपने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी चीन मुद्यावरुन मनमोहन सरकारला सुमारे दोन डझन निवेदने दिली होती, अनेक वेळा तत्कालीन सरकारला सावध केले होते व स्पष्टीकरण मागितले होते.

उदाहरणार्थ, २०१३ च्या पणजीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत, भाजपाने “सुरक्षा आणि स्वाभिमान” या विषयावर स्वतंत्र ठराव मंजूर केला,

ज्यात असे म्हटले होते:

“आमच्या मच्छिमारांना दक्षिणेकडील समुद्रात पकडले जात आहे आणि ठार मारले जात आहेत, आमच्या सैनिकांचे शिरच्छेद केले जात आहेत. चीन भारताच्या सीमा भागात वेळोवेळी घुसखोरी करत आहे.चीनच्या सैन्याने भारतीय भूभागात सुमारे १ कि.मी. अंतरावर घुसखोरी केली आणि सुमारे एक महिन्यापर्यंत तेथे ठाण मांडून आहेत आणि आमचे केंद्रातले सरकार केवळ थापा मारत आहे कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. ”

जून २००९ च्या जून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीत पारित झालेल्या राजकीय ठरावात असे म्हटले आहे की

“लडाखजवळील सीमावर्ती भागात चिनी हल्ल्याची ताजी बातमी आहेत. सद्यपरिस्थितीत सरकारने देशाला विश्वासात घेणे आवश्यक आहे,अशी भाजपची मागणी आहे.”

सद्याचे केंद्रीय मंत्री तथा तत्कालीन भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी १८ सप्टेंबर २००९ रोजी एक निवेदन जारी केले होते, ज्यात असे म्हटले होते की,

“मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारतावरील चीनी आक्रमण झपाट्याने वाढत आहे. २००८ मध्ये २३३ हल्ले झाले आहेत, ज्यात केवळ एलएसीचे उल्लंघनच नाही तर भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचाही चीनचा मनसुबा आहे. सीमेवर पायाभूत सुविधा आणि बळकटीकरणाची आवश्यकता आहे”

पुढे बोलताना ते म्हणाले होते,

भारत सरकार चीनबद्दल का उदासिन भूमिका घेत आहे. का चीन प्रश्नाकडे भारत सरकारचे दुर्लक्ष होत आहे? सरकार कठोर पाऊले का उचलत नाही? आम्हाला सरकार आणि चीनच्या नात्याबद्दल शंका आहे”

माध्यमांना माहिती देताना शिष्टमंडळाचे सदस्य असलेले राजीव प्रताप रुडी म्हणाले की,

यूपीए सरकार सीमांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे तसेच भारत सरकारची प्रत्येक कृती भेकडपणा दर्शवत आहे.

एका बाजूला भाजपाने सोनिया गांधी यांच्या चीन दौर्‍याविरोधात आणि चीनच्या प्रतिनिधींनी राहुल गांधींच्या भेटीविरोधात भाजपनं आक्रमक मोहीम उघडली असताना दुस-या बाजूला भाजपच्या वेबसाइटनुसार, चीनचे राजदूत झांग यान यांनी १६ऑक्टोबर २००९ रोजी तत्कालीन भाजपा प्रमुख आणि विद्यमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती आणि ही बैठक तासभर चालली होती.

ऑगस्ट २०१० मध्ये सीपीसीच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री आय पिंग यांच्या नेतृत्वात चीनमधील सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. जानेवारी २०११ मध्ये गडकरी सीपीसीच्या आमंत्रणावर चीनला गेले होते. ह्या बद्दल मात्र भाजपा नेते काहीही बोलत नाहीत.

Source : Indian Express

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!