करीना कपूरचं प्रेग्नन्सी बायबल वादाच्या भोवऱ्यात |

करीना कपूरचं प्रेग्नन्सी बायबल वादाच्या भोवऱ्यात |

करीना कपूरचं प्रेग्नन्सी बायबल वादाच्या भोवऱ्यात |

अभिनेत्री करीना कपूरचं गरोदरपणातले अनुभव मांडणारं पुस्तक प्रेग्नन्सी बायबल वादात सापडलंय. पुस्तकाच्या नावात बायबल हा शब्द वापरल्यामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आलाय. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करीना कपूरविरोधात लेखी तक्रार देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जगरनाॅटने करीना कपूरचं नवं पुस्तक प्रकाशित केलंय. समाजमाध्यमात गेल्या अनेक दिवसांपासून या पुस्तकाचं प्रोत्साहन सुरू आहे. प्रेग्नन्सी बायबल करीना कपूरच्या दोन बाळंतपणातील अनुभवांवर आधारित आहे. अगदी गरोदरपणापासून ते प्रसूतीपर्यंतची शारिरीक, मानसिक, आरोग्यविषयक निरीक्षणं त्यात आलीत. ॲमॅझाॅनवर हे पुस्तक सर्वोत्तम विकलं जाणारं म्हणून गाजतंय.

परंतु पुस्तकाच्या नावात बायबल शब्द वापरल्यामुळे, ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा दावा करत अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज दिलाय.

जिल्हाध्यक्ष जोसेफ, नितीन शिंदे, ब्रदर अरुण गायकवाड, मरियन रेड्डी व किशोर पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. तसंच या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक व अल्पसंख्यांक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांनी मात्र अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करत सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात असमर्थता दर्शवली आहे. अर्जदारांना मुंबईत तक्रार करण्याचा सल्ला दिला असल्याचं पोलिस सांगताहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!