पश्चिम बंगालातील नामचीन गुंड सांभाळणार देशाची कायदा व सुव्यवस्था ! शिक्षण आणि जन्मस्थानावरुनही संभ्रम !

पश्चिम बंगालातील नामचीन गुंड सांभाळणार देशाची कायदा व सुव्यवस्था ! शिक्षण आणि जन्मस्थानावरुनही संभ्रम !

पश्चिम बंगालातील नामचीन गुंड सांभाळणार देशाची कायदा व सुव्यवस्था ! शिक्षण आणि जन्मस्थानावरुनही संभ्रम !

धर्माधारित राजकारणातून प्राप्त लोकांच्या आंधळ्या विश्वासामुळे संघभाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना एक फाजील आत्मविश्वास निर्माण झालाय की आपण कसेही काहीही वागलो तरीही प्रत्येक चूक रेटून नेऊ शकतो. भाजपा समर्थक हिंदुंनीही स्वत:ची मानसिकता बनवून घेतलीय की भारताला हिंदुराष्ट्र बनवण्याच्या मोबदल्यात संघभाजपाने किती जरी नंगानाच केला तरी तो आपल्याला सर आंखो पर असणार !

आता पाहा. मोदींनी केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार केला, त्यावेळी आपण ग्रेट काहीतरी केलंय, असा त्यांचा अविर्भाव होता. चाटुकार माध्यमांकडून लोकांपर्यंत सत्य पोहचेल, याची अपेक्षाच संपुष्टात आल्याने, उद्या दाऊद इब्राहिमला जरी मोदींनी मंत्रीमंडळात घेतला तरीही, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदींनी कसा मास्टस्ट्रोक लगावलाय, याचं निर्लज्ज समर्थन करायला, ही लाचार माध्यमं मागेपुढे बघणार नाहीत.

निसिथ प्रामाणिक नावाचा अवघा ३५ वर्षीय सद्गृहस्थ मोदींनी देशाच्या गृहराज्यमंत्री पदी नेमून गृहमंत्री अमित शहांच्या सोबतीला आणलाय. मोदी सरकारातील ७८ मंत्र्यांपैकी ३३ जणांवर विविध फौजदारी गुन्हे दाखल आहेत. पैकी २४ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एकाविरोधात हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल आहे, ते हे महाशय…निसिथ प्रामाणिक !

हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, विनयभंग असे विविध ११ गुन्हे दाखल असलेली व्यक्ति भाजपाकडून तिकीट मिळवते, निवडून येते आणि केंद्रात मंत्री होते. खातं कुठलं तर गृहराज्यमंत्री !

पात्रता काय तर पश्चिम बंगालातील आहे. जसं नारायण राणेंना केंद्रीय मंत्री का करायचं तर शिवसेनेला नडायला आणि निसिथसारख्या ओवाळून टाकलेल्याला गृहराज्यमंत्री का करायचं तर तृणमूलला पर्यायाने ममता बॅनर्जींना नडायला ! देशहित जर खरोखरच मोदींच्या डोळ्यांसमोर असतं तर एक मर्डरी गुन्हेगार त्यांनी देशाचा गृहराज्यमंत्री केला असता काय ?

एक तर अशा माणसाला तुम्ही देशाच्या कायदा सुव्यवस्थेशी निगडीत महत्वपूर्ण पद कसं काय देता, हे चाटुकार माध्यमं विचारायची हिंमत करणार नाहीत, हे मोदींना माहितीय.

जे पत्रकार आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व असे मुद्दे उपस्थित करतात, त्यांच्याविरोधात बदनामीचा माहौल उभा करणे, खोटे गुन्हे दाखल करून छळ करणे हे नामी हत्यार मोदींकडे आहे. उलट, निसिथ प्रामाणिक हा कसा कट्टर मुस्लिमविरोधी आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी कसा मोदींनी त्याला केंद्रात आणलंय, वगैरे स्फूरण चढवणारे मेसेज खाद्य मेंदूहीनांना पुरवलं की मोदींचं काम सोपं होतं. तशीही असले मेसेज खरे की खोटे तपासायची सोयही देशात राहिलेली नाही.

सत्तास्वार्थ हा एकमेव उद्देश घेऊन राजकारणात वावरणाऱ्या भाजपाला निसिथसारखे मोहरे हवेच असतात. गुन्हेगारी प्रतिमेकडे दुर्लक्ष करत भाजपाने कूचबिहार मधून त्याला निवडून दिलं आणि तो खासदार झाला. आता तृणमूलला त्रास देण्यासाठी मोदींनी त्याला देशाच्या उरावर बसवला.

द हिंदू मधील एका बातमीतील निसिथच्या वक्तव्यानुसार, तो म्हणतो, भाजपा ही गंगा आहे आणि माझी पापं भाजपात आल्यावर धुवून निघाली आहेत.

निसिथ प्रामाणिक मागचा वादविवाद इथेच संपत नाही. बांगलादेशातून चालणाऱ्या एका फेसबुक पेजने निसिथचा जन्म बांगलादेशातील असल्याचा दावा केलाय. त्याचा उल्लेख सन ऑफ गायबंधा असा केलाय. निसिथच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचं शिक्षण आठवीपर्यंत असल्याची नोंद आहे. पण व्यवसाय प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक असा दाखवलाय. लोकसभेच्या वेबसाईटवर तो बॅचलर ऑफ काॅम्प्युटर एप्लिकेशन्स असल्याचं दाखवलंय.

२०१४ च्या लोकसभेत भाजपाचे ९८ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्या निवडणुकीच्या प्रचारसभांत, गुन्हेगार खासदारांना अपात्र ठरवून आधी संसद स्वच्छ करणार, हे मोदींचं आश्वासन होतं. त्याला जागून मोदींनी भाजपातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांची संख्या ९८ वरून ११६ वर नेली.

लोकसभेत बलात्काराचा आरोप असलेलेही तीन खासदार आहेत. त्यातील एक भाजपाचा आहे. देशविरोधी कारवायांचा आरोप असलेली प्रज्ञा ठाकूर लोकसभेत आहे. या पार्श्वभूमीवर निसिथ प्रामाणिकसारखा गुन्हेगार मोदींनी देशाच्या गृहराज्यमंत्री पदी आणणं जराही आश्चर्यकारक नाही. नवल वाटतं त्यांना, ज्यांना मोदींचा खरा चेहरा अजूनही उमगलेला नाही.

 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक,  मिडिया भारत न्यूज

 

 

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!