कार्तिकवारीवरही कोरोनाचं आणि निवडणुकीचंही सावट !

कार्तिकवारीवरही कोरोनाचं आणि निवडणुकीचंही सावट !

कार्तिकवारीवरही कोरोनाचं आणि निवडणुकीचंही सावट !

आषाढी वारीप्रमाणे आता कार्तिक वारीवरही करोनाचे संकट आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोलापुर ग्रामीण पोलिसांतर्फे यंदाच्या कार्तिकवारीला मर्यादा घालण्यात आली आहे.

जिल्ह्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची आचारसंहिता आणि येत्या २६ नोव्हेंबर रोजी येणारी कार्तिक वारी यामुळे पंढरपुरात जिल्ह्याबाहेरील लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यानच्या काळात शहरातील जडवाहतूक तसंच दिंडी यावर बंदी असणार आहे, त्यामुळे कार्तिक वारीचं निमित्त सांगून कोणालाही शहरात येता येणार नाही.

खासगी वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा तसंच अत्यावश्यक कामं असणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून पंढरपूर आगारात महाराष्ट्र शासनाच्या गाड्या तसंच बसेसना बंदीतून वगळण्यात आलं असलं तरी बसेसमधून कोणीही वारकऱ्यांनी शहरात येऊ नये अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.

अगदीच अत्यावश्यक काम असल्यास आपलं काम २५ नोव्हेंबर २०२० पूर्वीच करुन घ्यावं अथवा २६ नोव्हेंबर २०२० नंतर करावं. शक्यतो, या काळात प्रवास टाळावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

या काळात नागरिकांनी एकत्र जमणं, कामाव्यतिरिक्त बाहेर पडणं, स्थानिक लोकांनी शहराबाहेरील नातेवाईकांना शहरात बोलवणं तसंच मंदीर परिसरातील लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडणं इ. महत्वाच्या सुचना सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे देण्यात आल्या आहेत. सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!