सत्यशोधक दिंडीसाठी ठाणे शहर झालं सज्ज ! महात्मा फुल्यांच्या अखंडांचा घुमणार निनाद !!

सत्यशोधक दिंडीसाठी ठाणे शहर झालं सज्ज ! महात्मा फुल्यांच्या अखंडांचा घुमणार निनाद !!

सत्यशोधक दिंडीसाठी ठाणे शहर झालं सज्ज ! महात्मा फुल्यांच्या अखंडांचा घुमणार निनाद !!

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ रोजी ठाणे शहरात “सत्यशोधक दिंडी“ चं आयोजन करण्यात आलं आहे.

महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या 'सत्यशोधक समाजा’च्या स्थापनेस २०२३ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या तिन्ही स्तरांवर सर्व प्रकारच्या शोषितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जोतिबा फुले आयुष्यभर झटले. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हे करताना त्यांनी नेहमीच संवाद, सलोखा आणि सत्याची बाजू घेऊन संघर्ष केला.

आज त्या सत्यधर्माच्या परंपरेची कास धरणे गरजेचे आहे, या विचाराने प्रेरित होऊन ठाणे शहर व जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या वतीने 'सत्यशोधक विचार संवर्धन समिती, ठाणे' स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या वतीने भगवती मैदान (विष्णूनगर) ते कॉ. गोदुताई परुळेकर उद्यानापर्यंत दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर असणार आहेत आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. इ. हरिदास हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या दोन ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

या उपक्रमांमध्ये ठाणे शहर व जिल्ह्यांतील संस्था / संघटनांनीही सक्रिय सहभाग नोदवावा, असं आवाहन सत्यशोधक विचार संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.

सहभागी संस्था :
सत्यशोधक विचार संवर्धन समिती, ठाणे, भारतीय महिला फेडरेशन, स्त्रीमुक्ती संघटना, इंटक कामगार संघटना, आयटक, समता विचार प्रसारक संस्था, बहुजन विचार मंच, बँक एम्प्लॉईज असोसिएशन, अनुबंध, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वराज अभियान, ठाणे गावठाण, पाडे, कोळीवाडे संवर्धन समिती, परिसर सखी विकास संस्था, कायद्याने वागा लोकचळवळ, नारी अत्याचार विरोधी मंच, प्रागतिक पत्रकार सामाजिक संस्था, फातिमा शेख स्टडी सर्कल, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान, परचम, म्युज फौंडेशन, महाराष्ट्र महिला परिषद, महिला मंडल फेडरेशन, उडान, फ्रायडेज फॉर फ्युचर मुंबई, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, श्रमिक जनता संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, ऊर्जा ट्रस्ट, आवाज ए निस्वाँ, महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका संघ, नवनिर्माण सांस्कृतिक मंच, जन हक्क संघर्ष समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ऐक्यवादी), आदिवासी क्रांती सेना, पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान चावडी मंच, शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!