कोविडसंदर्भातील अफवांबाबत डब्ल्यूएचओचं काय म्हणणं आहे ?

कोविडसंदर्भातील अफवांबाबत डब्ल्यूएचओचं काय म्हणणं आहे ?

कोविडसंदर्भातील अफवांबाबत डब्ल्यूएचओचं काय म्हणणं आहे ?

जगात कोविडसंसर्ग सुरू झाल्यानंतर त्याबाबतच्या अफवा आणि उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. आपापल्या मनाने लोक अंदाज बांधत आहेत. अंदाजांना माहिती म्हणून पसरवत आहेत. माहितीला बळकटी मिळाली, म्हणून कोणाही तज्ज्ञांची नावं सोबत जोडली जात आहेत. मान्यता नसलेल्या उपायांचा दामटून प्रचार प्रसार केला जात आहे. वैज्ञानिक संशोधनापेक्षा राजकारण वरचढ झाल्याच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेचं मत मार्गदर्शक ठरू शकतं.

दारु पिणा-या व्यक्तीला कोविड संसर्गाचा धोका कमी असतो?

WHO – अजिबात नाही, उलट दारुमुळे आरोग्याच्या समस्या अधिक वाढतील

थर्मल स्कॅनर कॉविड -१९ कोविड रुग्ण शोधायला मदत करते का?

WHO – नाही,थर्मल स्कॕनरमुळे फक्त शरिरातील तापमान मोजल्या जाऊ शकते.ते कोविड-१९चे संक्रमित शोधण्यासाठी उपयोगाचे नाही.

सध्या कोविड -१९ च्या उपचार किंवा प्रतिबंधणासाठी कोणती औषधे परवानाकृत आहेत?

WHO – अद्याप आम्ही कोणत्याच लसीला किंवा उपचाराला आम्ही अधिकृतपणे परवाना दिलेला नाही.वेगवेगळ्या देशात संशोधन चालू आहेत.

आपल्या सूपमध्ये किंवा इतर जेवणात मिरची पूड,गरम मसाला वापरणे कोविड -१९ला प्रतिबंधित किंवा बरा करु शकतो?

WHO – नाही,जेवण चवदार बनू शकतं पण कोविड-१९ वर त्याचा परिणाम होत नाही.

 घरात उडणा-या मांशापासून,मच्छरांपासून कोविड-१९ संसर्गाचा धोका आहे?

WHO – असा कोणताच प्रमाण सिद्ध पुरावा अद्याप नाही.

ब्लिच किंवा इतर सौंदर्यप्रसाधने, स्प्रे कोविड पासून संरक्षण करु शकतात?

WHO – कुठलेही स्प्रे,सौंदर्यप्रसाधने कोविड साठी उपाय नाहीत,अतिजास्त वापरामुळे त्वेचेचा आजार होऊ शकतो.स्प्रेचा वापर डोळ्यांना त्रासदायक असतो.

मिथेनॉल,इथेनॉल किंवा ब्लीच चे सेवन केल्यामुळे कोविड -१९ ला आळा घालता येतो ?

WHO – मिथेनॉल, इथेनॉल, ब्लीचचं सेवन शरिरासाठी अत्यंत धोकादायक आहे. ते आपल्या अंतर्गत अवयवांसाठी हानीकारक आहे.

पृष्ठभागांवरील विषाणू नष्ट करण्यासाठी कधीकधी साफसफाईच्या उत्पादनांमध्ये मिथेनॉल, इथेनॉल आणि ब्लीचचा वापर करा परंतु आपण त्यांना कधीही पिऊ नये.

५ जी मोबाईल नेटवर्क मुळे कोविड-१९ पसरतो?

WHO – अजिबात नाही, कोविड रेडिओ लहरी, मोबाईल लहरी मार्फत पसरत नाही.

सुर्यप्रकाशात बसल्याने कोविड टाळता येऊ शकतो?

WHO – असे काहीही नाही,हवामानाचा कोविड वर काय परिणाम होतो ह्याविषयी कुठलच ठोस संशोधन आमच्या हाती नाही,जास्त तापमान असणा-या देशातही कोविड संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

एखाद्याला करोना होऊन गेल्यानंतर तो आयुष्यभर सोबत करतो?

WHO – एकदा पूर्णतः बरे झाल्यानंतर ती व्यक्ती निरोगीच असते.पुन्हा संसर्ग होऊ नये ह्याची काळजी मात्र घेतली पाहिजे.

 तरुणांना करोना संक्रमन लवकर होत नाही?

WHO – करोना आणि वयोगटाचा काहीही सबंध नाही.जगभरात सगळ्या वयोगटातील ब-याच लोकांना करोना संसर्ग झाला आहे.

(जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन)

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!