काँग्रेसने प्रधानमंत्र्यांना म्हटले, चायनीज मोदी !

काँग्रेसने प्रधानमंत्र्यांना म्हटले, चायनीज मोदी !

काँग्रेसने प्रधानमंत्र्यांना म्हटले, चायनीज मोदी !

भारत-चीन, भारत-नेपाळ सीमेवरील वादामुळे देशभरातून मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या धोरणांबाबत मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.समाजमाध्यमातून मोदी हे फक्त भाषण देणारे नेते आहेत त्यांच्याकडे सीमाप्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कुठलाच ठोस उपाय नाही, तसेच ह्या तणावाचा वापर आगामी बंगाल निवडणूकात कसा करता येईल ह्यावरच केंद्र सरकारच लक्ष असल्याची टिका नेटिझन्स कडून होताना दिसते आहे.

काँग्रसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधानावर टिका करताना ‘चायनिज मोदी’ हा शब्द वापरला तर काँग्रसचे जेष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी चीन सैन्याने भारताच्या भूभागावर आक्रमण केले असून सरकार त्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधांनानी चीनला दिलेल्या भेटीची आकडेवारीही जाहीर केली आहे.

१) पंडित जवाहरलाल नेहरु, अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी – १ वेळा २) लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, गुजराल जी – ० वेळा ३) डॉ.मनमोहन सिंग – २ वेळा ४) नरेंद्र मोदी- ९ वेळा (पंतप्रधान असताना ५ वेळा तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना ४ वेळा)

वरील आकडेवारीतून अहमद पटेल हे दर्शवू पहात आहेत चीनला मोंदीने दिलेल्या भेटी ह्या निष्फळ ठरल्या आहेत त्या भेटीतून कुठलाही ठोस कार्यक्रम दोन्ही देशांमध्ये झालेला नाही.

जास्तीत जास्त वेळा भेटी देणे म्हणजे foreign policy नव्हे. ह्या बाबतीत मोदी सरकार संपूर्णपणे आपयशी ठरल्याची टिका अहमद पटेल यांनी ट्विटर द्वारे केली आहे.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!