चेतना लाटकर, योजना अंबादे, जयश्री रगडे, प्रमिला मसराम आणि सलमा अन्सारी यंदाच्या सावित्री पुरस्काराच्या मानकरी !

चेतना लाटकर, योजना अंबादे, जयश्री रगडे, प्रमिला मसराम आणि सलमा अन्सारी यंदाच्या सावित्री पुरस्काराच्या मानकरी !

चेतना लाटकर, योजना अंबादे, जयश्री रगडे, प्रमिला मसराम आणि सलमा अन्सारी यंदाच्या सावित्री पुरस्काराच्या मानकरी !

कायद्याने वागा लोकचळवळीचे यंदाचे सावित्री पुरस्कार, २०२१ घोषित करण्यात आले आहेत. गडचिरोलीच्या चेतना लाटकर, कल्याणच्या योजना अंबादे, उल्हासनगरच्या जयश्री रगडे, ठाण्यातील प्रमिला मसराम आणि मुंब्र्यातील सलमा अन्सारी ह्या सावित्रीच्या लेकी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी पुरस्कारांची घोषणा केलीय.

कायद्याने वागा लोकचळवळीच्या सावित्री उत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे. सावित्री पुरस्कार हे या कार्यक्रमाचं ठळक वैशिष्ट्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत उभ्या राहिलेल्या, चौकट मोडून वेगळ्या वाटेवर चालू पाहणाऱ्या, स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, अडल्यानडलेल्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात कार्यरत अशा कोणत्याही क्षेत्रात दखल घेण्याजोगं काम करणाऱ्या स्त्रिया कायद्याने वागा लोकचळवळीच्या सावित्री पुरस्काराच्या मानकरी ठरतात.

गडचिरोलीच्या चेतना लाटकर महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. नुकताच त्यांनी मुंबईत उमेद कर्मचाऱ्यांसाठी सफल लढा दिला. सामाजिक भान जपत जगणाऱ्या कल्याणच्या योजना अंबादे शिक्षिका आहेत. उल्हासनगरातील जयश्री रगडे यांची सर्वसामान्य गृहिणी ते कंपनी सीईओपर्यंत घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. प्रमिला मसराम यांनी आदिवासी महिलांचं संघटन बांधलंय, तर मुंब्र्यात मुलींची फुटबाॅल टीम उभी करणाऱ्या सलमा अन्सारी बदलत्या काळातला युवा पिढीचा सकारात्मक चेहरा आहे.

शनिवार, ९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ४.३० वाजता कल्याणच्या महापालिका मुख्यालयासमोरील सार्वजनिक वाचनालय सभागृहात पुरस्कार वितरण होणार असून कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार लेखिका प्रतिमा जोशी, मराठी भाषाअभ्यासक, डॉ. नीतिन आरेकर आणि राईट टु पी कार्यकर्ता मुमताज शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यक्रम मुख्य समन्वयक वृषाली विनायक यांनी दिली आहे.

 

 

प्रफुल केदारे
माध्यम समन्वयक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!