धर्मांधतेचं देशविरोधी बहुमत !

धर्मांधतेचं देशविरोधी बहुमत !

धर्मांधतेचं देशविरोधी बहुमत !

२०१७-१८ दरम्यान भारतात वैद्यकीय क्षेत्रात ज्योतिषी घुसले. कुंडली पाहून ते आजारांवर भाष्य करू लागले. डाॅक्टरांवर तेव्हा धर्माचा कैफ होता. आता आयुर्वेद शस्त्रक्रियेत घुसतोय, म्हटल्यावर झोपा उडाल्यात. भाजपाचं राजकारण मल्टिपल आॅर्गन फेल्यूअर करणारं आहे. ते तुमची थेट हत्या नाही करत ; तुमचा एकेक अवयव निकामी करतं. तुम्ही तुमच्या बेजबाबदारपणाने मरता.

शेतकरी आंदोलनातल्या आक्रमकपणाला मोदी सरकारच्या २०१४ पासूनच्या लबाड राजकारणाची पार्श्वभूमी आहे. शेतकरी त्यामुळेच सावध आहे. त्याचा मोदी सरकारवर विश्वास नाही आणि तसंही हिंदुंना सतत मुस्लिम द्वेषाच्या गुदगुल्या करण्यापलिकडे मोदींनी फारसे दिवे लावलेले नाहीत. केवळ धर्मांधतेमुळे देशातला एक मोठा वर्ग सरकारच्या लबाडीकडे दुर्लक्ष करतोय, पण जो जागरूक आहे, तोच वेळोवेळी आवाज उठवतोय आणि तोच कधी हिंदुविरोधी, कधी देशविरोधी म्हणून हिनवला जातोय.

खरंतर, स्वत:च्या शिक्षणाबद्दलची माहिती लपवणं इतक्या एकाच मुद्द्यावर देशवासियांनी एक मोठं जनआंदोलन उभारून मोदींना प्रधानमंत्री पदावरून हाकलून दिलं पाहिजे होतं. पण धर्मांधतेपोटी मोदींचा शिक्षण लपवण्याचा आटापिटा खपून गेला.

नोटाबंदीच्या निर्णयातले पोकळ दावे खपून गेले. तब्बल चाळीस घोटाळेबाज देशाबाहेर मोदींच्या डोळ्यांदेखत पळून गेलेत ; पण मोदीसमर्थक त्या पळून जाण्याचंही निर्लज्ज समर्थन करतात. एकेक सार्वजनिक उपक्रम या अपयशी प्रधानमंत्र्याने अक्षरशः दादागिरीने संपवले आणि आपल्या बाॅसेसच्या घश्यात घातले. लोक मुडदे होऊन पडलेत.

पीएमकेअर्ससोबत केंद्र सरकारची वेबसाईट आहे, प्रधानमंत्रीचा फोटो आहे, सगळ्यात गंभीर, राजमुद्रा आहे, पण पीएमकेअर्स सार्वजनिक प्राधिकरण नाही, असं सरकार सांगतं आणि स्वयंघोषित मेरीटधारी नंदीबैलासारख्या माना डोलावतात.

देशहिताचे इतर विषय सोडाच, पण नमामि गंगेच्या २५ हजार कोटींचं तुम्ही काय केलंत, हा प्रश्नही कोणाला मोदींना विचारावासा वाटत नाही. म्हणजे ह्यांच्या धार्मिक श्रद्धाही तकलादू आहेत.

धर्मांधतेचं स्लो पाॅईझन आपल्याला दिलं गेलंय, याचं जराही भान नसलेले लोक त्यातून येणाऱ्या विषारी फुत्कारांनाच देशभक्ती समजू लागलेत. आज शेतकऱ्यांच्या विरोधात विखारी बोलू लागलेत.

उद्या हेच बुद्धीबधीर अंबानीअदानींची तळी उचलताना भारतीय सैन्याच्याही विरोधात बोलू लागले तर ते आश्चर्य नसेल. खरं तर हेच लोक देशाचे शत्रू आहेत. पण सद्या बहुमताच्या मुजोरीवर चोरांच्या उलट्या बोंबा सुरू आहेत.

 

 

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक व मिडिया भारत न्यूज चे संपादक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!