सोनू सूदकडे मदतयाचना करणाऱ्या मजुरांची ट्वीटस् कोणी डिलिट केली ?

सोनू सूदकडे मदतयाचना करणाऱ्या मजुरांची ट्वीटस् कोणी डिलिट केली ?

सोनू सूदकडे मदतयाचना करणाऱ्या मजुरांची ट्वीटस् कोणी डिलिट केली ?

महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी अभिनेता सोनू सूदने एक मोठी मोहिमच राबवली. सोनू सूदच्या फेसबुक,व्हाट्सअॕप, ट्विटरवर हजारो लोकांनी मदत मागितली आणि सोनूने प्रत्येक ट्विटला उत्तरेही दिली. बघता बघता सोनूच्या कार्याची दखल देशभरातल्या सर्व लोकांनी घेतली. पण आता एक नवा वाद समोर आला आहे, ज्यामुळे सोनू सूदच्या मदतकार्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे !

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोनू सूदने घेतलेल्या भेटीनंतर हा वाद आणखी जोर धरू लागला. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून सोनू सूदवर उघड संशय व्यक्त केला आहे.

आणखी एक गोष्ट नव्याने समोर येते आहे. ट्विटरवर सोनू सूदला मदत मागणारे हजारो ट्विटस् काढून टाकल्याचं दिसत आहे‌ आणि ज्यांनी सोनूला मदत मागितली ती ३०-४०% अकांउंटस् हे जानेवारी२०२० ते जून२०२० दरम्यान उघडण्यात आलेले आहेत. अजूनही समाजात अनेकांना ट्वीटर हाताळता येत नाही. पण मजुरांनी मोठ्या संख्येने ट्वीटरवरून सोनू सूदशी संवाद साधला. पण आता ती शेकडो ट्वीटस् डिलिट का होताहेत, हे एक मोठं गौडबंगाल आहे.

जर उप्र सरकारला राज्यात येणाऱ्या बसेसची इत्यंभूत माहिती हवी होती, जशी काँग्रेसकडे मागितली गेली, मग सोनू सूदच्याच बसेसला परवाना का मिळतोय, प्रियंका गांधींच्या बसेस ताटकळत उभ्या का होत्या? सोनू सूदला शासकीय रेल्वे कोणी उपलब्ध करुन दिली?

अभिनेता सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यामुळेच शंका उपस्थित केली. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सामना अग्रलेखात संजय राऊत लिहतात –

“सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. रेल्वे, बसेस, विमानाची तिकिटे त्यांनी काढली. प्रवासाची व्यवस्था केली. एक चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमांतून हे सर्व केले. ट्रस्टच्या माध्यमातून जमलेल्या पैशांतून मजुरांचा हा प्रवास खर्च उचलला असे सांगितले गेले. पण एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय?”

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून टीका करण्यात आली होती. मात्र आता मनसेने देखील सोनू सूदवरील टिप्पणी प्रकरणात उडी घेतली आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं, असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

ज्याने काम केलंय त्याचं कौतुक करूया, मनाचा मोठेपणा दाखवूया, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?

असा टोला देखील अमेय खोपकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.

News by Ankush Hambarde Patil

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!